स्वामी समर्थ गौरव गाथा

श्री स्वामी समर्थ गौरव गाथा

खंड १, २, ३ आणि ४ 

महाअवतार श्रीस्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या दृष्टांतानुसार त्यांचा ७२९ वर्षाचा प्रदीर्घ जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न गेली छत्तीस वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. महाराजांचे प्रकटीकरण, त्यांची आसेतू हिमाचल भ्रमंती, तेथील अद्भूत लीला, स्वामी कृपांकित घराणी, त्यांचेकडील प्रासादिक वस्तू, स्वामींचे शिष्य-प्रशिष्य-सेवकवर्ग आणि समग्र कार्य यावर संशोधन सुरु आहे. श्रींच्या कृपेने आजवर अठराशे पृष्ठांचे प्रदीर्घ लेखन घडले असून, श्रीस्वामी समर्थ गौरव गाथा या नावाचे ४  बृहद् खंड प्रकाशित झाले आहेत. 

गजानन महाराज शेगाव, साईबाबा शिर्डी, शंकर महाराज पुणे, रामाचार्य जमखिंडीकर, माधवनाथ महाराज चित्रकूट, बीडकर महाराज, १८४ वर्षाचे योगी कोळगाववाले बाबा आणि ज्यांचे देवघरासमोर गेली दहा वर्षे आपोआप उदीची रांगोळी येत असे, त्या स्वामी कृपांकित सुनंदाताई गुंडे या व अशा अनेक स्वामी समर्थ कृपांकित विभूतींची चरित्रे, तसेच श्रींची कृपा झाली अशा असंख्य घराण्यांचा परिचय; त्यांचेकडील प्रासादिक चर्मपादुका, गोटी, टोपी, दंड, वस्त्र यांचे चित्रांसहित दिला आहे. स्वामींचे प्रकटस्थान, छेलीखेडेग्राम, पंढरपूर, मुंबई, पेण, नळदुर्ग, अक्कलकोट, अरवली, सोलापुर प्राचीन तीर्थक्षेत्र रामतीर्थ, तेथील त्रिविक्रम यतिं आणि त्यांचे शिष्य, रामाचार्य जमखिंडीकर यावर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.

योगीराज शंकर महाराजांचा अदभूत जीवनपट, सोलापुर, नगर, अक्कलकुवा, मुंबई, नाशिक, पुणे येथील शंकर महाराज भक्त, कृपांकित घराणी, महाराजांची लीला स्थाने, असंख्य प्रासादिक वस्तू व त्यांच्या आठवणी दुर्मिळ छायाचित्रांसहित सादर केल्या आहेत. स्वामी समर्थ शिष्य रामानंद बीडकर महाराज पुणे, यांचे समग्र जीवन चरित्र व कार्य, शेगावच्या गजानन महाराजांवरील स्वामी कृपेचा वृत्तांत, योगाभ्यानंद माधवनाथ महाराज, चित्रकूट यांचा जीवनपट दुर्मिळ छायाचित्रांसहित उलगडला आहे.तुम्ही clothes साठी बाजारात असाल, तर आमचा प्लॅटफॉर्म हा तुमचा सर्वोत्तम पर्याय आहे! सर्वात मोठा शॉपिंग मॉल! 

ज्यांचे देवघर विभूतीने भरलेले असून ज्यांचे देवासमोर तिथी, वार, नक्षत्रानुसार आपोआप उदीची रांगोळी येत असे अशा ईश्वर कृपांकित सुनंदाताईच्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ साधनेचा आढावा, सुमारे साठ वर्षे शिरडी येथे वास्तव्य करून ज्यांनी हजारो लोकांना सन्मार्गाला लावले, त्या साईबाबांचा समग्र जीवनपटाचा अभ्यास करून त्यांचे जन्मस्थान, त्यांचा गृहत्याग, कल्याण-भिवंडी परिसरातील वास्तव्य अशा पूर्वायुष्यातील घडामोडींचा प्रदीर्घ लेखाजोखा सादर केला आहे.  तसेच नानासाहेब चांदोरकर, दासगणू महाराज, चरित्र लेखक दाभोळकर, तात्यासाहेब नूलकर, प्रधान, देवमामलेदार, गंगागिर बाबा, श्यामा देशपांडे, गवळीबुवा, कोळगाववाले बाबा, मेहेरबाबा, इत्यादि असंख्य साईकपांकित भक्त मांदियाळीचा सचित्र परिचय अस्सल छायाचित्रांसहित प्रकाशित केला आहे. आजवर प्रकाशात न आलेला हा अपूर्व माहितीचा खजिना म्हणजे स्वामी भक्तांना पर्वणी आहे. हे शोधग्रंथ, उत्तम प्रतीच्या कागदावर ऑफसेट छपाईने रंगीत चित्रांसहित सुबक पध्दतीने छापलेले आहेत. या ग्रंथाना प्रचंड मागणी असून, त्याच्या अगदी अल्प प्रति शिल्लक आहेत. आजच आपलेप्रत नोंदवून या कार्याला यथाशक्ति सहकार्य करावे हीच नम्र प्रार्थना.