प्रा. नम्रता भट
लेखिका /संपादिका /प्रकाशिका
प्रा. नम्रता भट ह्या एक संशोधक, संपादक आणि प्रकाशिका आहेत. संपूर्ण हिंदुस्थानातील साधू संतांची चरित्रे लिहिण्याची स्वामींची त्यांना आज्ञा झाली. प्रारंभी त्या हे कार्य आपली कॉलेज मधील लेक्चररशिप सांभाळून करीत होत्या. सतत भ्रमंती, वाचन, लेखन, छायाचित्रण, संदर्भ ग्रंथ आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या हि तारेवरची कसरत सुरु होती. पण पुढे या दोन्ही गोष्टी एकाचवेळी करणे आणि त्यांना न्याय देणे जमेनासे झाले म्हणून स्वामींच्याच आज्ञेने नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ ह्या संशोधन कार्यालाच वाहून घेतले. अर्थातच ह्या कार्याला वाचकांचा आणि स्वामी भक्तांचा उदंड प्रतिसाद लाभत गेला आणि उत्तरोत्तर रात्रंदिवस हे कार्य सुरु झाले ते अगदी आज अखेर सुरूच आहे. प्रा. नम्रता भट ह्या आकाशवाणी रत्नागिरी आणि मुंबई केंद्रावर सेवारत होत्या. दैनिक सागर, रत्नागिरी टाइम्स, स्त्री, स्वराज्य, लोकसत्ता अश्या अनेक नियत कालिकातून गेली ४४ वर्षे त्यां अव्याहतपणे लेखन करित आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःचा प्रकाशन व्यवसाय सुरु केला.
प्रथम त्रिदल आणि रजिस्ट्रेशन मिळाल्या नांतर शब्द त्रिदल ह्या नावाने १९८४ पासून त्यांनी विविध विषयांवर संपूर्ण संशोधन करून, प्रतिवर्षी नावीन्यपूर्ण विशेषांक प्रकाशित केले. उदा. संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रे, देव आहे किंवा नाही, संपूर्ण भारतातले किल्ले, कुसुमाग्रज काव्य विशेषांक, चौदा विद्या चौसष्ठ कलांवरील विशेषांक इत्यादी वैविध्य पूर्ण वार्षिक विशेषांक प्रसिद्ध केले ज्याचे संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम स्वागत झाले. प्रा. नम्रता भट ह्यांनी आजवर, संपूर्ण हिंदुस्थानातील सुमारे बाराशे संतांची चरित्रे लिहून साडेतीन हजार पृष्ठांचे, चौदा किलो वजनाचे “सकल संत चरित्र गाथेचे” ७ खंड प्रसिद्ध केले आहेत. हे कार्य कुठल्याही जात, पंथ, धर्म, संप्रदाय अथवा प्रादेशिक सीमांनी मर्यादित नसून, पूर्णपणे संशॊधनपर आहे. केवळ साधू संतच नव्हे तर संसारात राहून कार्य करणाऱ्या अनेक सज्जन व साध्वीची चरित्रे तसेच समाज कार्यकर्त्यांना प्रकाशात आणण्याचे काम स्वप्नील प्रकाशन तर्फे त्या करीत आहेत.
त्यांची लेखन शैली अत्यंत सुगम असून सामान्य वाचाकलाही रुचेल आणि पचेल अशी आहे. त्यांनी ह्या पूर्वी ललित लेखन व काव्य निर्मितीहि केली आहे. स्वामी समर्थांच्या जीवन चरित्राचा आढावा घेणारा “स्वामी समर्थ गीत गाथा” तसेच “ओवी ते अंगाई” नामक प्रबोधनपर सांगीतिक कार्यक्रमही त्या सादर करतात. पत्रकारिता, वक्तृत्व, लेखन, संशोधन, भ्रमंती आणि प्रकाशन असे सर्व गुण एकाच व्यक्तीच्या ठायी सापडणे तसे दुर्मिळच. त्यांच्या ह्या गुणसंपदेमुळेच स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना ह्या कार्यासाठी नियुक्त केले. या त्यांच्या कार्याची दखल पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, सेतू माधवराव पगडी इत्यादी मान्यवरांनी घेतली आहे. महाराष्ट्राच्या साहित्यात व अध्यात्मिक ग्रंथसंपदेत श्रीमती नम्रता भट यांनी मोलाची भर घातलेली आहे.
स्वामी समर्थांच्याच प्रेरणेने व मार्गदर्शनाने केवळ त्यांचेच समग्र जीवन चरित्र, त्यांचे शिष्य, प्रशिष्य, शेकडो मठ, असंख्य कृपांकित घराणी आणि त्यांची अक्कलकोटला येण्या पूर्वीची सडे सहाशे वर्षांची क्षेत्र भ्रमंती ह्याचा पाठ पुरावा प्रा. नम्रता भट यांनी २००७ पासून सुरु केला. त्या संशोधन प्रकल्पातील “स्वामी समर्थ गौरव गाथा” नामक सुमारे २००० पृष्ठांचे, ४ बृहद खंड, २०१४ अखेर लिहून त्यांनी प्रकाशित केले. ह्याच विषयावर त्यांचे अधिक ससंशोधन सुरु असून उर्वरित माहितीचा आढावा घेणाऱ्या एक संक्षिप्त ग्रंथाचे लिखाण सध्या सुरू आहे.
गेली ३३ वर्षे त्यांचे हे कार्य अहोरात्र अव्याहत पणे सुरू आहे. त्या प्रित्यर्थ अनेक पुरस्कार आणि मान सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या अफाट कार्याची दखल श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट ने घेतली. दि.२४ मे, २०१६ रोजी “स्वामी चरण प्रसाद” नामक सर्वोच्च पुरस्कार वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथे, शेकडो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत, त्यांना समारंभपूर्वक बहाल करण्यात आला.
ताजा कलम
🙏श्री स्वामी समर्थ🙏
सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार
मी यापूर्वी लिहिलेले श्री स्वामी समर्थ गौरव गाथा ग्रंथ आता उपलब्ध नाहीत. त्याच्या सर्व प्रती संपल्या आहेत. परंतु माझे स्वामी समर्थ महाराजांवरील संक्षिप्त ग्रंथाचे लिखाण सद्ध्या तयार झाले आहे. मधल्या काळात मी आजारी होते. स्वामी कृपेने प्रकृती आता स्थिर आहे. परंतु दोन्ही डोळ्यांची तक्रार आल्याने प्रूफ तपासणे, डीटीपी इत्यादि कामामुळे ह्या वेळी ग्रंथ प्रकाशनास थोडा विलंब झाला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्य स्वामी पूर्ण करून घेतील अशी मला आशा आहे.
यापूर्वी प्रकाशित झालेली कोणतीही पुस्तके आता वितरणात नाहीत याची मायबाप वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. ती सर्व पुस्तके पुनः प्रकाशित करणे आर्थिक आणि मनुष्यबळाअभावी अशक्य आहे. परंतु स्वामींची पूर्वी संपादित केलेली तसेच काही नवी गवसलेली माहिती या संक्षिप्त ग्रंथाद्वारे जास्तीत जास्त स्वामी भक्ता पर्यन्त आणि वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे मी ठरवले आहे. ह्या कार्यात आजवर सर्व स्वामी भक्त, सेवेकरी आणि साधकानि हस्ते-परस्ते, आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय पातळीवर मला सहाय्य केले त्या साठी मी आपली ऋणी आहे. ह्या ग्रंथाची प्रथम आवृत्तीच्या एक हजार प्रती छापल्या जातील. सुमारे 600 हूंन अधिक पानांचा हा ग्रंथ होईल असा सद्ध्या तरी अंदाज आहे.
माझी विनंती आहे की आपण सर्वानी ह्या पुस्तकाच्या प्रती खाली दिलेला फॉर्म भरून वितरण व्यवस्थेसाठी आधीच नोंदवून ठेवाव्यात. ही पुस्तके केवळ पुस्तक विक्रेते किंवा दुकानांमध्ये न ठेवता थेट आप्ल्या घरी कुरियर ने पाठवली जातील. यामुळे पुस्तक वितारणाचे ख़र्च कमी होऊन वाचकांना मात्र रु.११००/- अधिक टपाल ख़र्च प्रत्येक प्रति मागे साधरण १.५ ते २ किलो वजन असल्याने महाराष्ट्र्रात अंदाजे रु. १७५ ते २०० येइल. तसेच अन्य राज्य किंवा देशा बाहेर पाठवायचे असल्यास त्याहुन अधिक येत असल्याने प्रत्येक प्राति मागे केवळ पॅकिंग आणि कुरियर खर्च जास्ती आकारला जाईल.
पुस्तक छपाईला जाण्यास काही अवधि आहे. त्यामुळे आपला संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, ग्रंथ मागविण्याचे ठिकाण तसेच इच्छित ग्रंथांच्या प्रती इत्यादि खालील फॉर्म भरून आम्हाला कळवाव्यात. पैसे देण्या संबंधी आपण 9930957168 या whatsapp नंबर वर फॉर्म भरून झाल्यावर सम्पर्क साधा. प्रत्यक्ष ग्रंथ प्रकाशित झाल्यावर आपल्याशी संपर्क करून खात्री केल्यावरच आपल्याला कुरियर ने पाठविण्यात येईल. सर्व प्रती लौकर संपून जाण्याची शक्यता असल्याने आपल्याला एकाहून अधिक प्रती हव्या असल्यास अथवा आपल्या कुणी नातेवाईक, मित्र मंडळींनि ते घ्यावे अशी इच्छा आपण सर्वाना हा फॉर्म भरण्यास पाठवा. तसेच ग्रंथ अनेकांना एकत्रीत मागवायचे असल्यास निवास पत्ता वेगळा लिहून कुरियर पत्ता एकच लिहावा जेणेकरून आम्हाला एकाच ठिकाणी सर्व प्रती एकत्रित पाठवणे सोपे होईल.
हे पुस्तक श्री स्वामी कृपेने April 2024 अखेरीस छपाईला जाइल् आणि मे महिन्यात प्रकाशित होईल हे आम्ही सर्वाना कळवत आहोत.
🙏🏻प्रा. नम्रता भट🙏
www.swapnilprakashan.com
फॉर्म कृपया फक्त इंग्रजी भाषेत आणि रोमन लिपीत भरून पाठवावा ही विनंती.