अक्कलकोट सचित्र दर्शन

अक्कलकोट सचित्र दर्शन

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात सातत्याने उल्लेखलेल्या व त्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट मधील निवडक भ्रमंती स्थळांची सचित्र माहिती.  दैनंदिनी स्वरूपातील हे अभिनव कॅलेंडर आम्ही अक्कलकोट स्वामींच्या आज्ञेने व प्रेरणेने नुकतेच प्रकाशित केले.पुढील पानावर स्थळ व त्याच्या पृष्ठभागी त्या स्थळाशी निगडीत अख्यायिका व त्याचा सध्याचा ठाव ठिकाण विस्तृत स्वरूपात ग्रथित केला आहे. आम्ही प्रत्येक स्थळाला व्यावसायिक छायाचित्रकारा सोबत प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या माणसांच्या गाठी घेऊन हे पुस्तक छापले आहे. हे पुस्तक आपण आपल्या घरी, ठिकाणी सतत स्वामींचे स्मरण राहावे म्हणून ठेवू शकता अथवा आपले इतर स्नेही, प्रियजन व स्वामी भक्तांना सदिच्छा भेट म्हणूनहि देऊ शकता. चौसष्ट पानांचे रंगीत कॅलेंडर असून तूर्त पुनः प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अधिक माहितीकरिता आपला ई-मेल आम्हाला कळवा अथवा ९९३०९५७१६८ व्य नंबर वर संपर्क करा